मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) दिल्लीवारी सध्या चांगलीच चर्चेत असते. आता निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना मिळालेल्या मान-सन्मानामुळे त्यांची दिल्लीवारी चर्चेत असून त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) दिग्गज नेते, केंद्रीयमंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री दिसून येत आहेत. मात्र, या रांगेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वात शेवटच्या रांगेत असल्याने अनेकांकडून टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे (NCP) नेते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही हा फोटो ट्विट करुन, हे पाहून वाईट वाटल्याचं म्हटलं आहे.
#EknathShinde #PMNarendraModi #Delhi #AmolMitkari #NCP #TETScam #AbdulSattar #NitiAayog #UttarPradesh #SanjayRaut #MaharashtraPolitics